आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत बैठक
नागपूर : १९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सहविचार सभेचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान प्रलंबित प्रकरणे आजच निकाली काढा, अशी आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी तंबी दिली आणि जिल्ह्यातील ४ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात अनुकंपा तत्त्वाअंतर्गत पुष्पम कुंभरे (नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदनवन) यांना कनिष्ठ लिपिक सेवक, सौ. मंगला प्रवीण मंडपे (गौतम विद्यालय डोंगरगाव तालुका कुही) यांना मुख्याध्यापकपदी, श्री. तुलशीदास पटले यांना अर्धवट ग्रंथपाल पदावरून पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नयन तर श्री. रियाज हकीम कुरेशी यांना कालबद्ध पदोन्नती मान्यता देण्यात आल्या. यासह सभेतील इतरही प्रलंबित विषय तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या. यावर शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार मॅडम यांनी सर्व प्रकरणे लवकर निकाली काढण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे, विजय गोमकर, धनराज राऊत, लक्ष्मीकांत व्होरा, मंगेश घवघवे, सचिन इंगोले, बांबल सर, राजू मोहोड, दत्तराज उमाळे, गणेश चापले, शैलेश येडके, पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थीत होते.
OPS OPS
WE WANT OPS.
OPS OPS
WE WANT OPS