नागपूर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी तीन प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आले.
यात श्री. सुमित नामदेव शेंडे (सुधाकर झाडे हायस्कूल भगवाननगर नागपूर) यांना अनुकंपा तत्त्वांतर्गत शिपाई सेवक पदावर, श्री. सत्यजित गंगाधर डंबारे (बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल, जि. नागपूर) यांना कनिष्ठ लिपिक सेवक यांना शालार्थ प्रणालीमध्ये नोंद व श्रीमती वंदना निळकंठराव काळे (बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल, जि. नागपूर) यांना उपमुख्याध्यापक पदावर मंजुरी प्रदान करण्याबाबत “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आल्या. तसेच इतर प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली.
तसेच नागपूर जिल्ह्यातील समस्यांवर २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्यासोबत सहविचार सभा घेण्यात येईल, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी निर्देश दिले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, गंगाधर पराते, प्रकाश भोयर, उमाकांत सांगोळे व समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.