Skip to content

माझी जन्मभूमी शेतकरी कुटुंबातील आणि कर्मभूमी शिक्षण व सहकार क्षेत्रातील. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी व सहकार हे माझे जिव्हाळ्याचे विषय. सदर क्षेत्रात अधिक वेळ घालविल्याने या क्षेत्राच्या समस्या मी स्वतः अनूभवलेल्या आहे. विधान परिषदेत निवडून आल्यापासून मी या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना माझ्या कामाची माहिती देऊ इच्छितो आणि त्यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात अधिक चांगले बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहतो आहे. त्यासाठी मला विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविणाऱ्या माझ्या शिक्षकवृंदांचा आभारी आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून गेल्या काळात केलेल्या कामाची माहिती सादर केली आहे.

सुधाकर गोविंदराव अडबाले

विधान परिषद सदस्य (नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघ), सरकार्यवाह, विदर्भ माध्यामिक शिक्षक संघ.

sudhakar adbale