आमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : नागपूर बोर्डात समस्या निवारण सभा
चंद्रपूर : नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयात मंडळ मान्यतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे बैठकीत आमदार सुधाकर अडबाले यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंडळ मान्यता आस्थापनेची चौकशी कमिटी नेमून तपासणी करा व प्रलंबित मंडळ मान्यता ८ दिवसात निकाली काढा, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सभेची सुरुवातच वादळी ठरली. सभेला न येणाऱ्या नागपूर, चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यावर कारवाई करा, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी बोर्ड अध्यक्षांना दिल्या.
सभेत उच्च माध्यमिक शाळातील – महाविद्यालयातील नवनियुक्त कनिष्ठ महाविद्यालय – उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे, मार्च / ऑगस्ट २०२४ पेपर तपासणीचे व मॉडरेशनचे मानधन ज्या शिक्षकांना मिळाले नाही, त्या शिक्षकांना देण्यात यावे, परिक्षा केंद्रावर केंद्र संचालक, रनर, लिपीक, पर्यवेक्षक तर उत्तरपत्रिका तपासताना मुख्य नियामक, नियामक व परीक्षक चोखपणे पार पाडणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, त्याबाबत वरिष्ठांकडे मागणी करावी, रनर हा माध्यमिक शिक्षकच असावा, रनर बंद करून पूर्वीप्रमाणे अतिरिक्त संचालक नियुक्त करण्यात यावे, भरारी पथकामध्ये प्राथमिक शिक्षकांना घेण्यात येऊ नये, भरारी पथकाचे कार्य निश्चित करण्यात यावे, इयत्ता १० वी / १२ वीचे केंद्र देताना विद्यार्थ्यांच्या शाळेपासून फार लांब अंतर देण्यात येऊ नये, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी बोर्ड अध्यक्षांना दिल्या. यासह इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या विषयपत्रातील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात याव्या, अश्याही सूचना देण्यात आल्या. सभेला बोर्ड विभागीय अध्यक्ष सावरकर मॅडम, रवींद्र काटोलकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, अनिल गोतमारे, संजय वारकर, विठ्ठल जूनघरे, अविनाश बढे, विष्णू इटनकर, महेंद्र सालंकार, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, राजेश धुर्वे, अजय लोंढे, विजय गोमकर, धनराज राऊत, अरुण कराळे, लक्ष्मीकांत व्होरा, मंगेश घवघवे, शैलेश येडके, सचिन इंगोले, बांबल सर, बोके सर, राजू मोहोड, पंजाब राठोड, अनंत जायभाये, संदीप चवरे, हुलके सर, गलांडे सर, बांबल सर, विज्युक्ताचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, डॉ. नितीन देवतळे, डॉ. प्रवीण चटप, प्रा. प्रमोद उरकुडे, पोमेंद्र कटरे व विमाशी संघ व विज्युक्ताचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.