भंडारा जिल्ह्यातील शाळांचे वेतनेत्तर अनुदान तात्काळ वितरित करा

आमदार सुधाकर अडबाले यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवाणार्थ सहविचार सभा
भंडारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ सहविचार सभा ३ नोव्हेंबर २०२६ रोजी समिती कक्ष, जिल्हा परिषद, भंडारा येथे पार पडली.
सुरुवातीला माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. मार्च २०२६ पासून जिल्ह्यातील शाळांचे वेतनेत्तर अनुदान अजूनही वितरित न झाल्याने आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. वेतनेत्तर अनुदान तात्काळ शाळांना वितरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दिले.
यानंतर प्राथमिक विभागातील समस्यांबाबत सहविचार सभा घेण्यात आली. मात्र, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अनुपस्थित असल्यामुळे प्राथमिक विभागातील सर्व संघटनांची माझ्या उपस्थितीत संयुक्त सभा दिवाळीनंतर घेण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सदर सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, वेतन पथक अधीक्षक दुपारे मॅडम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह श्री. राजेश धुर्वे, कोषाध्यक्ष श्री. धीरज बांते, श्री. श्रीधर खेडीकर, श्री. पंजाब राठोड, श्री. लांजेवार, श्री. अनंत जायेभाये, श्री. विलास खोब्रागडे, श्री. प्रभाकर मेश्राम, श्री. शशांक धुर्वे, मनोहर कापगते, रोहित मरस्कोल्हे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शाह व कार्यालयातील संबंधित अधिकारी तसेच समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

☏ WhatsApp वर संपर्क