नागपूर जिल्ह्यातील सभेत ९ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने प्रलंबित प्रकरणांस मान्यता
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची समस्या निवारण सभा
नागपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा ११ सप्टेंबर २०२५ रोजी खेडेकर सभागृह, जि.प. नागपूर येथे पार पडली. या सभेत विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ९ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आली.
सभेत वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ/निवड श्रेणी प्रकरणे व अन्य प्रकरणे कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची बाब आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षात आली. यावर आमदार अडबाले यांनी आजच्या आज मान्यता देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले. त्यानुसार सभा संपताच माधव मनिराम ठावरी (ऋखडाश्रय विद्यालय, कुही) यांना उपमुख्याध्यापक पदावरील उन्नतीस कार्योत्तर मंजुरी, नेहा राजेंद्र कानडे (बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल) यांना निवड श्रेणी, माधवी जयसिंग खिंची (बनारसीदास रुईया हाय. काटोल) यांना निवड श्रेणी, अनिल भुरे (साईनाथ विद्या मंदिर (हाय) व कनिष्ठ महा. प्रगतीनगर नागपूर) यांना मुख्याध्यापक पदाचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार, रुषी प्रदिप कट्टा (जीवन विकास विद्यालय उमरेड) यांना सेवासातत्य, दुर्योधन उमराव चौधरी (पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी) यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ, अरुण हरिश्चंद्र केळवदे (पंडित नेहरू हाय. जगदीश नगर, मकरधोकडा काटोल) यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ, संजय सदाशिव ठवकर (पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी) यांना वरिष्ठ श्रेणी, दिनेश कृष्णाजी बारापात्रे (गौतम विद्यालय, डोंगरमौदा कुही) यांना वरिष्ठ श्रेणीस ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे सभेत निदर्शनास आले. अनुकंपा प्रकरणाबाबत तात्काळ कॅम्प लावून प्रलंबित प्रकरणे २३ सप्टेंबरपूर्वी निकाली काढा, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या. वेतनेत्तर अनुदान येऊनही पाच महिन्यांचा कालावधी झाला तरीही वेतनेत्तर अनुदान शाळांना मिळालेले नाही. त्यामुळे वेतनेत्तर अनुदान १५ दिवसांत वितरीत करण्याबाबत सूचना दिल्या. मान्यता वर्धित व मंडळ मान्यताबाबत कॅम्प लावून निकाली काढण्यात याव्या, २०२३-२४ मध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठे व कधी केले, याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात यावी, शिक्षण विभाग (माध्य.) कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या.
सभेत १५० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रकरणे सभेच्या आधीच निकाली काढण्यात आली. ही सभा चार तास चालली.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) गौतम गेडाम, वेतन पथक अधीक्षक श्री. चव्हाण, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, महामंडळ सदस्य विश्वास गोतमारे, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, कार्यवाह अविनाश बडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, विमाशी संघाचे वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, विजय गोमकर, अरुण कराळे, मंगेश घवघवे, रवींद्र बिजवे, प्रमोद अंधारे, धनराज राऊत, लक्ष्मीकांत व्होरा, निलेश खोरगडे, शैलेश येडके, दिनेश ढगे, विशाल बंड, सचिन इंगोले, दिलीप बांबल, संजय वांगे, छत्रपाल राऊत, अभिनव ढोबळे, प्यारेलाल लोणारे, नाईट हायस्कूलचे ठाणेकर सर, जुनी पेन्शन महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, मुरलीधर काळमेघ, नागपूर महानगरपालिका संघटनेचे राकेश दुम्पलवार, निजाम सर, गोतमारे सर, मांडवकर सर व विमाशी संघाचे पदाधिकारी, सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.